Showing posts with label खोपा. Show all posts
Showing posts with label खोपा. Show all posts

खोपा

 




तिचा मंजुळ आवाज,गुंजे राघूच्या या कानी

बोलावती भेटावया,मैना गाऊनिया गाणी...


हुंदका गुंतला तिचा,कंठ सुकला सुकला

राघू काहून तू असा,माझ्या संग रे फुगला...


पेरू जांबाच्या झाडाले,राघू मारतोया चोचा

मैना इनवणी करे,येरे परतुनी खोपा...


लागे भांडण वाढीस,मैना रुसली खोप्यात

राघू खुपसूनी बैसे,चोच तयाची जांबात 


मैना हळव्या मनाची,सांगे ओरडूनी घसा

राघू वाटे तसा वागे,रुसुनी बैसला जसा


गेला राघू खोप्यामंधी,मैना हसली गालात

आपुलकी प्रेम दिसे,राघू मैनाच्या प्रेमात