Showing posts with label १ले साहित्य संमेलन २०१८-नाशिक. Show all posts
Showing posts with label १ले साहित्य संमेलन २०१८-नाशिक. Show all posts

१ले घे भरारी साहित्य संमेलन - नाशिक २०१८

 

पहिले घे भरारी युवा साहित्य संमेलन नाशिक 2018
 
 
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय सभागृह नाशिक इथं 22 जुलै 2018 रोजी पार पडलेल्या घे भरारी साहित्य समूहाच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अविस्मरणीय सुवर्णक्षण.....

उद्घाटक :- दीक्षा ताई लोंढे ( नगरसेविका नाशिक)
स्वागत अध्यक्ष :- भीमराव कोते पाटील
संमेलनाध्यक्ष :- तुकाराम धांडे
युवा कवी संमेलन अध्यक्ष :- सागर काकडे
प्रमुख उपस्थिती ;- चंद्रकांत वानखेडे, संजीवनी राजगुरू, दीप पारधे, शार्दुल ठाकुर, डॉ अशोक शिंदे

◆ आयोजक

• तेजस शिवाजी गायकवाड
• पवन तिकटे
• पुरुषोत्तम चंद्रात्रे
 





 

नात्यात एक अपुल्या साधा करार ठेवू

गझल...

नात्यात एक अपुल्या, साधा करार ठेवू
हातात हात ठेवू, प्रीती अपार ठेवू...

दुःखास पाहुनी जर, रडलो उगाच आपण
सोसेल काळजाला, तितकाच भार ठेवू...

डोळ्यात बोलणारी, आहेत आसवेही 
ओतून तेल डोळा, डोळे तयार ठेवू...

न्यायालयात त्यांच्या, खोटा करार चालू
आश्वासने नकोशी, शब्दांत धार ठेवू...

माखून टाकले मी, रक्तात हात माझे
नेण्यास देह त्यांचा, खांदेच चार ठेवू...

थोडे जगावयाचे, होते मला इमानी
आयुष्य व्यर्थ झाले, आता उधार ठेवू...

मी ढाळलेत अश्रू, चिंतेमधे तिच्याही
आता उगाच का, मी दावे हजार ठेवू...

● पवन  तिकटे,