ये कलरफुल ऐक ना !



आज खूप दिवसांनी तिचा फोन आला.
ती : काय करतोय
मी : हॅलो कोण ? (मी हळूच विचारलं)
ती :  अरे मी तुझी पिल्लू
विसरलास की काय इतक्या लवकर.
मी : नाही ग, इतक्या लवकर कसे विसरेल तुला.
      खूप स्वप्न बघितली आहे ना तुझ्यासोबत.
अन ते साक्ष करण्याचं ध्येय देखील ठरवलं आहे
मग सहजासहजी कसे विसरेल मी तुला
शक्यच नाही .
ती : हो का ?
मी : का बरं, म्हणजे काही संशय.
ती: नाही रे वेड्या
मी:  मग
ती : असच
मी : बर ऐकना,
     तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही.
ती : ठीक आहे रे पिल्लू,
     मी रोज करत जाईल तुला कॉल, नको tension घेऊस.
चल बाय भेटू कॉलेज मध्ये
मी : बाय
बाय म्हणालो अन सकाळी कॉलेजला लवकर गेलो.
वेडीच्या भेटीसाठी आनंदातच तिच्या येण्याची वेड्यागत वाट पाहू
लागलो. कॉलेज च्या गेटवर एकटाच उभा राहत.
पाहता पाहता कॉलेज भरायला शेवटची पाच मिनिटे बाकी होती.
तरी तिची वाट पाहणं मी सोडत नव्हतो. अस वाटायच आता येईल
नंतर येईल पण नाही कॉलेजची घनटा वाजली.
वर्गामध्ये जाऊन बसलो तिच्या मैत्रनिना विचारणा केली,
की माझी पिल्लू आज का नाही आली.
उलट माझीच थट्टा करत " तुला माहिती तुझी पिल्लू का नाही आली ती"
तिची मैत्रिन बोलली...

जसाजसा वेळ जात होता, सैरावैरा जीव होत होता. की अजूनही का नाही आली.
तिच्याविना एकांत असा भासू लागला की जणु कुणीतरी हृदयाच्या
आरपार थेट काळजावर जोरदार घाव केला असावा....
कॉलेज सुटणायची वेळ झाली, मी जोरात धापा टाकत टाकत घरी आलो
कपाटातुन मोबाईल काढला , अन missed call चेक केले ... एकही नाही.
मेसेज चेक केलं तेही नाही..
स्वतःला दोष देऊ लागलो, की काय झालं असावं तिला.
"किती दुःख मनात माझ्या
मी स्वतःच झेलतो, दुःख माझे
किती घाव हृदयात माझ्या
मी स्वतःच पेलतो, घाव माझे"

संध्याकाळ झाली तिच्या फोनची वाट पाहू लागलो,
वाट पाहता पाहता कधी ती रात्र सरली कळलच नाही.
सकाळी जाग आली तसाच ताडकन उठलो अन मोबाईल घेतला
पाहतो तर काय सकाळचे पाच वाजलेले .
अन एकही मिसकॉल नाही...
पहिला दिवस सरला, दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघालो
चहा आटोपला अन कोलेजकडे धाव घेतली.
तिची वाट नेहमी रोजच्या सारखी पाहत होतो , ती नाही आली.

वर्गामध्ये बसलो अन माझे डोळे अचानक फिरू लागले,
अशक्तपणा जाणवू लागला कारण ठरवलं होतं ना की, तिचा कॉल
आल्याशिवाय जेवण करायचं नाही.
तो दुसरा दिवसही कसाबसा काढला. तिच्याविना,
कॉलेजमधून आल्यावर डोकं जड पडलं . काहीच सुचत नव्हते
अन सलग दोन दिवस जेवण न केल्याने अशक्तपणा जाणवणे साहजिकच
होते.
घरी आल्यावर जशी बॅग फेकून दिली अन रडत रडत कॉटवर तसाच पडलो
तिच्या आठवणीत, आई म्हणाली की दोन दिवसापासून जेवण करत नाहीये
काय झालंय.?
मी तिच्या रागाच्या भरात बिचाऱ्या आईवर ओरडलो, की " मला भूक
नाहीये, मनात आल्यावर करेल जेवण"
तीही बिचारी ऐकून शांतपणे काहीही नाही बोलली.
तिसऱ्या दिवशीही कॉलेजमध्ये नाही आली,
त्या दिवशी मित्राचा वाढदिवस होता. वर्षातून एकदाच येणारा
आनंदाचा क्षण म्हणजे वाढदिवस..
मित्राचा मोठा हट्ट होता म्हणून थोडंफार केक खाल्ला.
सलग तीन दिवस जेवण नाही , तब्बेतीमध्ये कमतरता भासू लागली
अन हे घरच्यांच्या पण लक्षात आले.

सरता  सरता एक आठवडा सरला.सलग सात दिवस ती कॉलेजला आली नाही.
मग आठव्या दिवशी तिचे आगमन  झाले.
तिला पाहिल्यावर एकदम भारावून गेलो. काय करावे काहीच सुचत नव्हते.
तिच्यावर रागवाव की प्रेमाने समजूत घालावी, की, तुला या प्रेमवेड्याची आठवण
नाही आली का ग.?
मला तिला बोलायचं होत पण माझी एक अट होती,की सुरुवात तिने करावी.
कॉलेज भरल्यावर ती आली वर्गामध्ये बसली. मी सारखा तिच्याकडे पहात होतो.
रडूही येत होतं. की माझी पिल्लू एकवेळ माझ्याकडे वळून बघेल. पण नाही
ती तिच्या मैत्रनिना बोलण्यात, हसण्यात इतकी व्यस्त होती की एकक्षण तिची
मान माझ्याकडे नाही वळाली..

तासांवर तास निघून गेले. कॉलेज सुटण्याची देखील वेळ झाली.
तरी तिची मान काही वळाली नाही.
कदाचित माझयाहीपेक्षा जास्त ती तिच्या मैत्रनिवर प्रेम करत असेल, या कारणास्तव
तिने पाहिले नसेल.....

कहते हे,अगर किसीं चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने
की कोशीष मे लग जाती हे.........
पण माझ्या आयुष्यात उलटंच....

तिला पाहिल्यावर माझ्या आतील कवी जागा व्हायचा त्याक्षणी तसच,

अफाट होती तुझी समरणशक्ती
मलाच कसे काय विसरलीस
कुणास ठाऊक
अबोल होते तुझे बोल
मग मला बोलण्यासाठी का नाही निघाले
कुणास ठाऊक.......

निराश होऊन घरी आलो,
तिच्या कॉल ची वाट पाहू लागलो कॉल आलंच नाही
ये कलरफुल ऐक ना!
मला बोलायचं आहे तुझ्याशी,
एकतरी कॅल कर ना मला...जिवंत राहण्यासाठी..

:- पवन तिकटे
राहेरी
ता. सिंदखेड राजा
जि. बुलडाणा

7350942506...

No comments:

Post a Comment