Showing posts with label पुस्तक परीक्षण. Show all posts
Showing posts with label पुस्तक परीक्षण. Show all posts

नात्यात एक अपुल्या साधा करार ठेवू

गझल...

नात्यात एक अपुल्या, साधा करार ठेवू
हातात हात ठेवू, प्रीती अपार ठेवू...

दुःखास पाहुनी जर, रडलो उगाच आपण
सोसेल काळजाला, तितकाच भार ठेवू...

डोळ्यात बोलणारी, आहेत आसवेही 
ओतून तेल डोळा, डोळे तयार ठेवू...

न्यायालयात त्यांच्या, खोटा करार चालू
आश्वासने नकोशी, शब्दांत धार ठेवू...

माखून टाकले मी, रक्तात हात माझे
नेण्यास देह त्यांचा, खांदेच चार ठेवू...

थोडे जगावयाचे, होते मला इमानी
आयुष्य व्यर्थ झाले, आता उधार ठेवू...

मी ढाळलेत अश्रू, चिंतेमधे तिच्याही
आता उगाच का, मी दावे हजार ठेवू...

● पवन  तिकटे,