Showing posts with label सुलेखन पवन. Show all posts
Showing posts with label सुलेखन पवन. Show all posts

डोळ्यामध्ये तिच्याही

गझल....



डोळ्यामधे तिच्याही, उजळून पाहिले मी
प्रतिबिंब ते स्वतःचे, जवळून पाहिले मी...

डोळे मिटून माझे, आली कुठून स्वप्ने
आयुष्य मग तयांशी, चिघळून पाहिले मी...

केली कधी सुखाने, माझी तमा जराशी
आक्रोश वेदनांचे, उधळून पाहिले मी...

ती कौतुके नकोशी, सखये तुझ्या मुखाने
प्रत्येक वेदनेला, चघळून पाहिले मी...

दाटून ऊर येतो , स्वप्नात भेट होते
कंठात आसवांना, मिसळून पाहिले मी...

दुःखास टाळले मी , मौनास पाळले मी
माझ्याच सावलीला , कवळून पाहिले मी...

पवन बालाराम तिकटे