बाई आणि नदी

 




🌿



नदी आक्रंदते खळखळ आवाजाने

ऐकवत बसते तिच्या प्रवासाचे  दुःख 
सतत स्पर्शून जाणाऱ्या
वेदनाहीन निर्जीव खडकाला...

नदी जगवत असते
माश्यांना, खेकडांना, बेडक्यांना 
अगदी नुकत्याच जन्म घेतलेल्या पिल्लांना सुद्धा
तिच्याच गर्भाशयात...

मी बघितलंय,
नदीच्या उरावर तरंगत असतात लहान मुले
पूर्णतः नागडी होऊन
शेणाने भरलेल्या  म्हशी
अन म्हशीच्या उरावर 
नदी भ्रमंती करणारा... पांढरा सपक बगळा

मी बघत असतो,
नदीकिनारी धुवायला येणाऱ्या बायकांना
हिसळतात मळके कपडे निरम्याने
बडवत असतात नदीच्या एखाद्या जीर्ण खडकाला
काढत असतात राग घरातल्या वादांचा
नदीकाठी...
धुतलेल्या कपड्यांचा मळ आणि चवीने घातलेल्या निरम्याचा विष प्राशन करून 
नदी वाहत जाते संथ गतीने
ओसांडून...

बाईची आणि नदीची 
सुख दुःखे
सारखीच असतात
असं ऐकलंय,
या दोघांचेही डोळे सारखीच वाट धरतात
आयुष्याचा प्रत्येक क्षण 
वाहून नेण्या संदर्भात...

- पवन तिकटे


No comments:

Post a Comment