अ. भा. म. साहित्य संमेलन आणि आम्ही तिघे




अखिल भारतीय साहित्य संमेलन या आधी कधीही गेलो नाही, पण नाशिक ला असल्याने जाण्याचा मुख्य हेतू म्हणजे तेजस आणि पुरु ची भेट, आणि बरेच घे भरारी  परिवारातील भेटणार होते आम्हा तिघांना एकत्र  आणि गझल कट्टा म्हणून जाणं गरजेचंच होत.

सलग दोन दिवस चालणारा गझल कट्टा आणि गझल कट्ट्याच्या हॉलमध्ये सतत वाजणाऱ्या टाळ्या, शिट्ट्या प्रत्येक जणांच्या काळजातून येणारी  वाहवा ची दाद अजूनही कानात गुंजत आहे..

सर्वच मुशायरे जबरदस्त झालेत.. मनोमन वाटत रहायच हा वेळ संपूच नये असच ऐकत राहावं सर्वांना..

3 ला संमेलन ला गेल्यावर पहिल्याच दिवशी होणारा सत्कार बघून नाशिक ला येणे सार्थकी झालं असं वाट लागलं मृणाल ताईंनी  सुशीला संकलेचा माईंच्या हस्ते केलेला सत्कार हि खूप मोठी गोष्ट होती आमच्या तिघांसाठी. घे भरारी चे पहिले संमेलन नाशिक लाच घेतले होते.  सुशीला माईंची तेव्हा भेट झाली त्यांनी आमच्या साठी त्यावेळी दिलेला खूप उर्जात्मक होत.

संमेलनात भीमराव दादा कोते असायला हवे होते असंही मनोमन वाटत होत. आज असते तर कविकट्टाच नियोजन त्यांच्याचकडे असते. दादांनी तो अप्रतिम नियोजनद्वारे सफल सुद्धा केला असता. कारण दादांनी घे भरारीच्या पहिल्या संमेलन साठी दिलेला त्यांचा नारायण सुर्वे हॉल अन अमूल्य वेळ हे खूप होत आमच्या साठी

आज दादा नाहीत पण संमेलनात दादांचा माणसांच्या कविता हा संग्रह बघून आनंद झाला..

फेसबुकवर नुसत्या नावाने ओळखणारे बरेच जण होते... त्यांची भेट झाली हे खूप आनंदनिय क्षण..

गझलकट्ट्याच नियोजन खूपच छान पद्धतीने केलेला होता. पण असणारा हॉल हा   असलेल्या जागेपेक्षा तेवढाच जास्त असता तरीही रसिकांची गर्दी दरवाजाच्या बाहेरही असती एवढे मात्र नक्की जाणवलं त्या दिवशी...

4 चा गझल मुशायरा झाल्यावर 5 ला खरेदी करू असे आम्ही तिघांनी ठरवलेलं,  पण पुस्तकांच्या स्टोलवर सुद्धा बरेच जण भेटत होते गझल कट्टा बद्दलच बोलत होते. विशेष म्हणजे तुम्ही युवांनी गझल मुशायऱ्यात चांगलीच उंची वाढवली असं म्हणत होते..  हि त्यांची दाद अजूनही मनातून जात नाही...

                                         

चला हवा येऊ द्या' हा शो लागला रे लागला की सर्वत्र एकच हशा पिकतो. लोकांना मनापासून हसायला लावणाऱ्या मालिकेवर सर्वच मराठी प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले आहे. या शो मधील एकच असा क्षण येतो जेव्हा सर्वच निशब्द होतात आणि हास्यकल्लोळाची जागा घेतात डोळ्यातील पाणी. आपल्या लेखणीने ही किमया कोण करु शकतो, असा विचार तुमच्याही मनात आला असेल. त्याचे उत्तर आहे पत्रास कारण की  अरविंद जगताप सर यांची भेट झाली खूप छान वाटलं

Sharad Tandale  सरांना जेव्हा भेटलो म्हणे कुठे असतोस, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ , राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान . मातृतीर्थ  सिंदखेड राजाहून आलोय हे ऐकून सरांनी बराच वेळ दिला. तो होणारा संवाद आणि त्यात सरांनी सांगितलेलं मार्गदर्शन खूप आवडलं..





- पवन तिकटे

No comments:

Post a Comment