घे भरारी

 नाव - घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र...

स्थापना - 22 ऑक्टोबर 2017

संस्थापक - १) ॲड. तेजस गायकवाड

                 २) पवन तिकटे

                 ३) पुरुषोत्तम चंद्रात्रे

चिन्ह -

समाज माध्यम संकेतस्थळ - 

फेसबुक - घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र

इन्स्टाग्राम - ghe_bharari_sahitya_samuh

युट्युब - गंध माझ्या शब्दांचा



तत्व -

१) साहित्यसेवा, व्यासपीठ उपलब्ध करून देणं, आणि लेखन-वाचनाची आवड रुजवणं


कार्यक्रम

१) पहिले घे भरारी साहित्य संमेलन नाशिक

२) स्व. विलासराव देशमुख पुण्यस्मरण निम्मित आयोजित काव्य मैफिल

३) दुसरे घे भरारी युवा साहित्य संमेलन, जालना

४) तिसरे घे भरारी साहित्य संमेलन, नागपूर (नियोजित)


घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र हा समूह 2017 साली प्रत्येक लिहत्या हाताला व्यासपीठ मिळावं, त्यांना प्रवाहात येता यावं आणि त्यांच्या लिखाणाला मार्गदर्शन व्हावं तसेच महाराष्ट्रभर कवितांचे कार्यक्रम होऊन त्यातून जात, धर्म अशा कोणत्याही बंधनाशिवाय माणसं जोडली जावी या व्यापक उद्देशाने  स्थापन करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत समूहाद्वारे कार्यक्रम, ऑनलाइन चर्चासत्रे, काव्य स्पर्धा, पत्र-निबंध लेखन स्पर्धा आणि इतर अनेक स्पर्धा राबवल्या जातात. स्पर्धेत सुरवातीला स्पर्धकांना लेखनाबाबत व्यवस्थित मार्गदर्शन आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धकाची ओळख लपवून परीक्षण केलं जाणं हे या समूहाचं नावीन्य आहे. स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रभरातून अतिशय नामवंत परिक्षक परीक्षनासाठी नेमले आहेत. परिक्षकांकडून निकषांच्या आधारावर निकाल बनवून घेणारा आणि परीक्षकांना स्पर्धकांच नाव कळू न देता गुप्त ठेवणारा हा एकमेव समूह आहे. या समूहाने अनेक संकल्पना पहिल्यांदाच राबवल्या असल्या तरी त्या खूप यशस्वी झाल्या आणि त्या पुढं अनेक ठिकाणी राबविल्या गेल्या. समूहाद्वारे आयोजित केली जाणारी भरारी प्रीमियर लीग ही स्पर्धा खूप नावाजलेली स्पर्धा आहे. २०१९ पासून मागच्या सलग चार वर्षांपासून ही स्पर्धा राबवण्यात येते. या स्पर्धेला महाराष्ट्र आणि देश व विदेशातून मराठी भाषिक कवी स्पर्धक म्हणून लाभले आहेत. उत्कृष्ट नियोजन, कमालीची पारदर्शकता, निःपक्षपाती गुणांकन आणि वेळोवेळी मार्गदर्शन हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. सलग काही महिने चालणारी ही स्पर्धा स्पर्धकांनी कायम गौरवली आहे. यासोबतच समूहाद्वारे सुरवातीच्या काळात घे भरारी काव्य लेखन महास्पर्धा सुद्धा आयोजित केली जात होती. सध्या सुरू असलेली भरारी प्रीमियर लीग ही स्पर्धा त्यांचंच अध्यावर स्वरूप आहे. दरवर्षी वाढत जाणारा प्रतिसाद, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील कवी जोडलं जाणं आणि त्यांना त्यांच्या प्रतिभेची ओळख होणं हे काम यासमूहामुळे सदैव सुरू आहे


स्थापना वर्षांनंतर लगेचच समूहाद्वारे नाशिक इथं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केलं गेलं होतं. यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक कवी-साहित्यिक आणि रसिक यांनी सहभाग दर्शवला होता. अभ्यासक्रमातील कवी तुकाराम धांडे हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.  यासोबतच दीप पारधे, संजीवनी राजगुरू, चंद्रकांत वानखेडे, भीमराव कोते पाटील हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर पुढील वर्षी जालना इथं झालेल्या साहित्य संमेलनात देशविख्यात उर्दू शायर शम्स जालनवी हे उद्घाटक होते तर डॉ. पल्लवी बनसोडे या अध्यक्ष होत्या. डॉ. राज रणधीर स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनात सुद्धा अफाट प्रतिसाद लाभला होता. मराठवाड्यासारख्या म्हणजेच जो भाग साहित्य, लेखन आणि वाचन यांच्या बाबतीत कायमच दुर्लक्षित राहिला. तिथं कार्यक्रम घेणं, कविता पोहचवणे आणि तिथल्या प्रतिभावंत कवींना व्यासपीठ देणं हे समूहाच पहिलं उद्दिष्ट आहे. आणि तेच काम समूह पहिल्या वर्षांपासून करतो आहे. आजघडीला हजारहून अधिक कवी, लेखक साहित्यिक समूहाद्वारे जोडलेले आहेत. त्यामध्ये शिक्षक, शेतकरी, गृहिणी, तरुण, तरुणी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नव्याने लिहणारे आहेत. तिन्ही तरुण संस्थापकांचा तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत माणसं जोडण्याचा जो संकल्प आहे तो अविरत सुरू आहे....


No comments:

Post a Comment